मोदी-शाहांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत, मुंबईत शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Share This Story

मुंबई: सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत केल्याप्रकरणी मुंबईच्या सायन पोलिसांनी शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये वरळीतील सोशल मीडिया शाखा समन्वयक रोहन पाटणकर आणि पुणे येथील युवासेना आयटी सेलचे नितीन शिंदे यांचा समावेश आहे. दोन्ही आरोपी शिवसेनेच्या आयटी सेलशी संबंधित असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या दोघांचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.

काय आहे प्रकरण?

रोहन पाटणकर (१९) याने १ ऑगस्ट रोजी त्याच्या ट्विटर प्रोफाइलवरून एक पोस्ट अपलोड केली. ज्यामध्ये पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांचे चेहरे मॉर्फ करण्यात आले होते. यासोबतच आक्षेपार्ह साहित्यही अपलोड करण्यात आले. त्यानंतर शिंदे यांनी पोस्टची पुष्टी केली आणि फोटो रिट्विट केल्याचा आरोप आहे. भाजपाची जनमानसात प्रतिमा मलिन करण्यासाठी आरोपींनी हे कृत्य केल्याची तक्रार विजय पगारे यांनी केली असून त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Join Channels

Share This Story